मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची चर्चा कोण करतंय हे मला माहिती नाही. अशी चर्चा जर कोण करत असेल तर ते मुर्ख आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यात सध्या बहुमताचं सरकार आहे. आम्हाला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. काही किरकोळ गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लावत असतील तर ते योग्य नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.
अशा किरकोळ गोष्टीवरुन कुणी राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करत असेल तर त्यांनी देशाची राज्यघटना एकदा वाचून यावी, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा तारखा देऊनही महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही, असं म्हटलं होतं.
सरकारचा निर्णय हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे. याच एका मुद्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळातंय.
महत्वाच्या बातम्या-
खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका
‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा
“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”