शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कृषी मंत्र्यांचं कृषी विधेयकावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | केंद्राने नव्याने संमत केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन पुकारलं आहे. यामुळे देशातील संपूर्ण वातावरण चागलंच चिघळलं आहे. आत्तापर्यंत आंदोलक आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा चर्चा झाल्या. मात्र, या चर्चांमधून कोणताही तोडगा निघालेला नाही.

अशातच आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यावर मोठं विधान केलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये, असं म्हणत नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. आज वृत्त माध्यमांशी ते बोलत होते.

नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, भारत सरकारने खूप विचार करून हे कृषी कायदे केले आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. तसेच वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे.

तरी देखील केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी या कायद्यावर चर्चा करून यामध्ये सुधारणा करण्यास तयार आहे. आंदोलनातील शेतकरी संघटनांशी चर्चेच्या सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. कोणत्याही कायद्याच्या तरतुदीवर आक्षेप असल्यास त्यावर आत्तापर्यंत चर्चा झाल्या आहेत आणि यापुढे देखील होत राहतील. पण शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असं तोमर यांनी म्हटलं आहे.

तसेच सरकार अद्याप देखील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. आम्ही प्रत्येक समस्येचा विचार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांनी कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये, असं देखील तोमर यांनी म्हटलं आहे.

कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशातील वातावरण चांगलंच चिघळलं आहे. या आंदोलनात जवळपास 5 लाख आंदोलकांचा सहभाग असल्याचं शेतकरी संघटना सांगत आहेत.

तसेच हे आंदोलन येत्या दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता रेल्वे ट्रॅक जाम करण्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! ‘या’ ठिकाणी फक्त 10 रुपयात गर्लफ्रेंड भाड्याने मिळतात 

“राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र; शरद पवारांचं नाव त्याच कटाचा भाग”

टोल नाक्यावर गाडी आडवली म्हणून थोबाडीत मारली; ‘या’ महिला नेत्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

‘UPA प्रमुख म्हणून माझी निवड होणार..’; UPAच्या अध्यक्ष पदावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार? आता ‘या’ बड्या कॉंग्रेस नेत्याचं थेट वक्तव्य, म्हणाले…