‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मी मुख्यमंत्रीपदच काय शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला देखील तयार आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती.

त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत. तुम्ही फक्त समोर येऊन चर्चा करा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घालूनही शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त दिसत आहे. राजकीय वातावरण तापलं असताना एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे.

आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली असल्याचं म्हटलं जात आहे. तर बहुमत आमच्याकडेच आहे, असा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केला आहे.

आमच्याकडे 40 आमदार असल्याने आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

आम्ही बैठक पुढे काय करणार ते सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे आणि याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी पहिल्यांदाच शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे यावर राष्ट्रवादी व काँग्रेसची काय प्रतिक्रिया असेल, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

सूरतमधून निसटून आलेल्या कैलास पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन; वर्षावर आता ‘इतकेच’ आमदार उरले

“काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं पण…”; बंडखोर आमदाराचं खुलं पत्र