“आजकाल नवीन ट्रेंड आलाय… महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणार नाही”

मुंबई | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर भाजपने देखिल आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती,.

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे. तर शहरातील शिवसेनेच्या 60 ते 70 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर सुद्धा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्यांवर टीका केली असून टोलाही यावेळी लगावला आहे.

सोमय्यांच्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, हे अतिशय दुर्दैवी आहे. असं कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेलं नाही.

आरोप जरूर करावेत, पण या देशात कायदा आणि सुव्यवस्था आहे, तुम्ही कोर्टात जा पण टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे इतक्या वेळा पत्रकार परीषद घेऊन नव्याने आरोप करण्याचा ट्रेंड आणला आहे का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणार नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रावरही जोरदार टीकाही यावेळी केली.

केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत असून विरोधी पक्षातच नोटीसा कशा येतात. या प्रश्नाचे उत्तर केंद्राने द्यायला हवं, असं त्या म्हणाल्या आहेत.

विरोधात गेला तर नोटीस आणि भाजपत आला तर सत्यवादी ही सरासर दडपशाही आहे. केंद्र सरकार लोकांना घाबरवत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गुजरातमधील बॅक घोटाळ्यासंबंधी बोलत असता त्या म्हणाल्या की, देशात झालेल्या कोणत्याही घोटाळ्याची जबाबदारी ही केंद्राने घ्यायला पाहिजे. गेली सात वर्षे देशात त्यांचच सरकार आहे. मग अशा घटना घडतात कशा?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा