‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

मुंबई | अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा मराठी चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात गाजला होता. मुळशीतील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. पुण्यासारख्या शहरात झालेल्या टोळीयुद्ध देखील या चित्रपटात दाखवण्यात आलंय.

मुळशीतील शेतकरी आपल्या जमिनी बिल्डरांच्या नावे केल्याने कशाप्रकारे आर्थिक संकटात सापडतात, हा प्रसंग देखील चित्रपटातून दाखवला होता.

या चित्रपटात ‘शेती विकायची नसते, राखायची असते’, असा फेमस डायलाॅग देखील आहे. अशातच आता प्रविण तरडे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शुटींग बंद असल्याने दोन दिवस गावाकडं आल्याचं त्यांनी यावेळी व्हिडीओमध्ये सांगितलं. प्रविण तरडे त्यांच्या शेतात गेले तेव्हा त्यांचे वडिल तेव्हा शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांनी हा व्हिडीओ काढला.

शेतकऱ्यांनी कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तरी खचायचं नाही, असं तरडे या व्हिडीओमधून सांगत आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांचं उदाहरण दिलं.

वडिलांनी पाच किलो वटाणा पेरला पण रोग पडल्यामुळं फक्त अर्धा किलो वटाणाच हाती लागला, असं त्यांनी सांगितलं आहे. तरीही माझे वडिल न खचता पुढील वर्षी 5 किलो वटाणा मिळेल या आशेने शेती करतात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शेती विकायची नसते, शेती राखायची असते आणि राखलेली शेती अशीच कसायची असते, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांची पत्नी देखील शेतात काम करताना दिसत आहेत.

दरम्यान, प्रविण तरडे वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावाकडं फेरफटका मारत असतात. प्रविण तरडे यांनी वारंवार शेतकऱ्यांबद्दल आपुलकी दाखवून दिली आहे. नेहमी ते वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा