‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

मुंबई | ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली होती.

इतकंच नाही तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. आता याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना सुनावलं आहे. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे उदयपूरची घटना घडल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तुम्हाला असं वक्तव्य करण्याची काय गरज होती, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता.

तम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही असं वक्तव्य केलं. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडलं आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी 

सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल 

…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का 

“देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं तर…”