पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुंबई | मुंबईत पुढचे 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काल मुंबईत पावसाचा orange alert देण्यात आला होता परंतु आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काल (दि.30) मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटींग केली. काल सकाळपासून सुरू झाले पाऊस रात्री 8 पर्यंत कोसळत होता, 12 तासात तब्बल 119 मिमी पावसाची नोंद झाली.

नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन मार्केटसह सखल भागात पाणी तुंबल्याने नागरिकांना या भागात वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागेल.

रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रूझ येथे सिग्नलमध्ये बिघाड तर परेल स्टेशन जवळ रेल्वे मार्गात पाणी आल्यामुळे रात्री 9 नंतर मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

कल्याण डोंबिवलीत रात्रभर पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासून पुन्हा कल्याण डोंबिवलित पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.

आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरुआहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

कोकणात देखील पाऊस सुरु आहे. संपूर्ण कोकणासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल 

…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का 

“देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं तर…” 

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे- शरद पवार