ओमिक्राॅननं टेन्शन वाढवलं! ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू लागू

भोपाळ | कोरोना रूग्णसंख्या कमी होत असतानाच आता देशात ओमिक्राॅनने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता संभाव्य धोका लक्षात घेता राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावावा, अशा सुचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. (Night curfew imposed in Madhya Pradesh)

कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक निवेदन जारी करून राज्यात कोरना कर्फ्यू कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. राज्यात कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळल्याने शिवराज सरकार चिंतेत आहेत. गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये पॉझिटिव्ह केसेस वेगाने वाढत आहेत.

सर्व राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक मध्य प्रदेशात पोहोचतात. त्यामुळे मध्य प्रदेश सरकार चिंतेत आहे, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे उदाहरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यावेळीही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढू लागली होती, त्यानंतर मध्य प्रदेशातही दुसरी लाट आली होती.

सणासुदीच्या काळात कोरोनाची प्रकरणे आणखी वेगाने वाढू शकतात. ख्रिसमस आणि नवीन वर्षात संसर्ग वेगाने पसरू नये म्हणून शिवराज सरकार आतापासून आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, आता मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागू केल्यानंतर आता इतर राज्य कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संसद आहे की आखाडा?, खासदारांची संसदेत लाथा बुक्क्यांनी तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ

“देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर मी तिकीट काढून देतो”

…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे

रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा 

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा