संसद आहे की आखाडा?, खासदारांची संसदेत लाथा बुक्क्यांनी तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ

घाना | लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठं महत्त्व आहे. लोकशाहीत संसदेला देखील महत्त्व आहे. संसदेत होणारी चर्चा ही लोकशाही जिवंत असण्याचं एक माध्यम आहे. (video from Ghana’s parliament is currently going viral)

अफ्रिकेतील घाणा देश हा लोकशाही देश मानला जातो. अशातच घाणाच्या संसदेतील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

घानाच्या संसदेत एका विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकार आणि विरोधकांमधील वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली. संसद भवनातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इलेक्ट्रॉनिक पेमेंट कर विधेयकावर घानाच्या संसदेत चर्चा सुरू होती. या विधेयकाला विरोधक वारंवार विरोध करत होते मात्र सत्ताधारी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत होते.

यावेळी विरोधी सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. संसदेतील गदारोळ पाहून उपसभापती जोसेफ ओसी-ओवसू यांनी विधेयकावर मतदान करा असं सुचवलं.

मात्र मतदानाच्या वेळी या विधेयकाच्या समर्थन आणि विरोधात समान मतं पडल्यानं पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. यानंतर प्रकरण इतके वाढले की हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.

संसदेत अनेक खासदारांनी मारहाण केली आणि अनेक सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकरण शांत झालं नाही. खासदारांमधील हाणामारी थांबत नाही तोच सुरक्षेत तैनात असलेल्या मार्शल्स यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र मार्शल थांबल्यानंतरही हाणामारी शांत न झाल्याने बराच वेळ खासदार एकमेकांना लाथा-बुक्के मारत राहिले. खासदारांनीही मार्शलवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता संसद आहे की आखाडा असा सवाल विचारला जातोय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर मी तिकीट काढून देतो”

…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे

रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा 

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता”