महाराष्ट्रात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | ओमिक्रॉन (Omicron) विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. ओमिक्रॉन विषाणू डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याने सर्व जगाने धास्ती घेतली आहे. केंद्र सरकारकडून देखील ओमिक्रॉन विषाणूबाबत सतर्कता बाळलगी जात आहे. त्यातच राज्याच हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आणि देशभरात रात्रीच्या लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र, काही विधानसभा सदस्य मास्क न घालताच सभागृहातच येत असल्याने अजित पवारांनी मास्कवरून सुनावलं आहे. कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही. ओमिक्रॉनचं संकट आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार देशभरात नाईट कर्फ्यू लावण्याच्या विचारात असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन लावण्याचा विचार राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आहे. आपल्या सर्व गोष्टी व्हिडीओ ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला थेट प्रक्षेपण केलं जातं. कितीही कोणी प्रयत्न केला तरी संकट संपलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायला हवी, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच सभापती नरहरी झिरवळ यांनी सर्व सदस्यांना माल्क लावण्याच्या सुचना केल्या आहेत. बोलताना जर अडचण येत असेल तर मास्क काढून ठेवा. अन्यथा मास्क लावूनच सभागृहात बसा, असं नरहरी झिरवळ यांनी सदस्यांना सांगितलं आहे.

कोरोना विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच परदेशात दिड दिवसात रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. येत्या काळात पाच लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अनेक सदस्य मास्कचा वापर करत नसल्याने अजित पवारांनी गुरूवारी चांगलंच सुनावलं आहे. उपमुुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहे. ज्याठिकाणी लोकांनी मास्क लावलेला नसेल तेथे लोकांची कानउघडणी केली आहे.

आज अधिवेशनात बोलताना अजित पवारानी ‘आपले हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू आहे. इथे बसलेले लोकप्रतिनिधी तीन-चार लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र काही जण ठराविक सोडले तर कोणीही मास्क लावत नाही, असं म्हणत सदस्यांची कानटोचणी केली आहे.

दरम्यान, कर्जत-जामखेड येथील एका मतदार संघात बऱ्याचं लोकांनी मास्क लावला नव्हता. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मास्क न लावल्याने अजित पवारांनी रोहित पवारांना झापलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

करूणा मुंडेंची राजकारणात एंट्री; केली ‘ही’ मोठी घोषणा

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, फडणवीस म्हणाले ‘मी स्वत: कर्नाटकात जातो अन्…’ 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर? 

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं