तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ

इस्लामाबाद | कोरोनाकाळात अनेक देशांतील शाळा, कॉलेज बंद होती. परंतु आता काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा, कॉलेज पुन्हा हळूहळू चालू होऊ लागली आहेत. पाकिस्तानमध्ये देखील पुन्हा एकदा हळूहळू सर्व महाविद्यालये चालू होऊ लागली आहेत.

पाकिस्तानमधील महाविद्यालये पुन्हा चालू होताच लाहोर विद्यापीठातील एक व्हीडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तरुणाला कॅम्पसमध्येच प्रपोज करताना दिसत आहे. लाहोर विद्यापीठातील या तरुणीने आपल्या वर्गमित्राला सर्वांसमोर खुलेआम प्रपोज केलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ही मुलगी वर्गमित्राला गुडघ्यावर बसून गुलाब देऊन प्रपोज करत आहे. तरुण देखील मुलीचं प्रपोजल स्विकारत तिला मिठी मारतो. या दोघांच्या आजूबाजूला तोबा गर्दी जमली आहे.

हा सर्व प्रसंग उपस्थित मुलं आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतात. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने या दोघांवर का.रवाई केली आहे.

या दोघांवर शिस्तभं.गाची का.रवाई करत विद्यापीठाने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र या दोघांनीही विद्यापीठाच्या नोटिसला उत्तर दिलं नाही. यामुळे विद्यापीठाने त्यांची हाकालपट्टी केली आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल होत आहे. तसेच विद्यापीठाने केलेल्या का.रवाईचा जगभरातील लोक निषेध करत आहेत. त्या दोघांना विद्यपीठातून काढू नये, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो- झरदारी यांनीही याबद्दल ट्विट केलं आहे. तसेच हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी देखील विद्यापीठाच्या का.रवाईचा नि.षेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार? महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल

ठाण्यात मेन रोडवर कार झाडाला धडकून जागेवर पलटली अन् मग…; पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या भावांना मिळाली ‘या’ शोमध्ये गाण्याची संधी, लोकांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ