Budget 2022 | अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटने दाखवली ताकद

मुंबई | अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटची सुरुवात मोठ्या वाढीने झाली आहे. निफ्टीने 17,500 चा टप्पा पार केला आहे. 09:20 वाजता सेन्सेक्स 544.38 अंकांच्या किंवा 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 58,558.55 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 133.15 अंकांच्या किंवा 0.77 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,473.00 च्या पातळीवर दिसत आहे.

बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीच्या 50 पैकी 44 समभाग खरेदी करताना दिसत आहेत. सेन्सेक्सच्या 30 पैकी 28 शेअर्समध्ये वाढ होत आहे तर निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये वाढ होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूतीसह बंद झाले.

सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 285.94 अंकांची वाढ दिसून आली.

बाजाराच्या तेजीमध्ये, जवळपास सर्वच क्षेत्रे पुन्हा एकदा हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. ऑटो, फार्मा, आयटी, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी समभागात तेजी दिसून येत आहे.

यासह, सेन्सेक्स 712.93 म्हणजेच 1.23 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.59-0.82 टक्क्यांनी वधारत आहेत.

आजच्या अर्थसंकल्पात तंबाखूजन्य पदार्थांवरील करात वाढ होऊ शकते. अशा स्थितीत आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्स यांचे लक्ष असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज रेंटल हाऊसिंगसाठी कर सूट आणि परवडणाऱ्या घरांसाठी मोठ्या घोषणा केल्या तर बांधकाम साहित्य निर्माते, सिमेंट कंपन्या, स्टील कंपन्या, रिअल इस्टेट कंपन्या आणि बांधकाम कंपन्या यासारख्या कंपन्यांना चालना मिळू शकते.

दरम्यान, गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी वाढ 2021 च्या अर्थसंकल्पात दिसून आली. 2021 मध्ये निफ्टी सुमारे 5 टक्के वर चढला होता. अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा गुंतवणूकदारांना नक्कीच आवडल्या होत्या. पण त्याच्या एक वर्ष आधी, म्हणजे 2020 च्या बजेटच्या दिवशी निफ्टीत 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार? 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक 

राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता… 

Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार?