अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते ‘एवढी’ मोठी रक्कम

नवी दिल्ली | सध्याच्या युगातील रनमशिन म्हटला जाणारा विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर धावा काढण्यासाठी धडपडत असेल, पण सोशल मीडियावर विराटचा धमाका सुरूच आहे.

इंस्टाग्रामवर विराटने 200 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

स्पोर्ट्स स्टार्सबद्दल बोलायचे झालं तर विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे विराट कोहलीच्या पुढे आहेत.

पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोचे 541 दशलक्ष चाहते आहेत. आणि अर्जेंटिनाच्या मेस्सीचे 334 दशलक्ष चाहते आहेत.

200 मिलियनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सेलिब्रेशन केलं. त्याने चाहत्यांचे आभार मानलेत.

प्रति इंस्टाग्राम पोस्टच्या कमाईचा विचार केला तर, हॉपर इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार कोहली 2021 मध्ये प्रथम क्रमांकाचा भारतीय सेलिब्रिटी आहे.

जगाबद्दल बोलायचं झालं तर कोहली 19व्या स्थानावर आहे. भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार कोहली, Instagram वर एका पोस्टसाठी सुमारे 5 कोटी रुपये घेतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा 

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” 

“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…” 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना आता रिझर्व्ह बँकेचा मोठा झटका! 

‘आघाडीचं मतांचं गणित बिघडलं?’; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर