“…तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला महत्त्व असतं”

जळगाव | भाजपचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यामध्ये सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करण्याचा सल्लाही त्यांमध्ये दिला आहे.

केवळ प्रसिद्धीसाठी सरकारवर आरोप होऊ नये. पुराव्यानिशी पूर्ण अभ्यास करून सरकारवर आरोप केले पाहिजेत. तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला अधिक महत्त्व राहिलं. याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली पाहिजे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाचा नेता हा उद्याचा सत्ता बदलणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी मी आज सभागृहात नसल्याची खंत व्यक्त केली. ती खंत मलाही आहे, असंही खडसे यांनी सांगितलं आहे.

लोकांना माझी आठवण माजी महसूलमंत्री म्हणून नाही, तर माजी विरोधी पक्षनेता म्हणून आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. तसेच माझा पक्षांतर करण्याचा काहीही विचार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-