गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका

जालना : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील महापूराची परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी सेल्फी व्हीडिओ काढला. त्यांच्या या वागण्यावरुन विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महापुराच्या वेळी सेल्फी घेणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणला पाहिजे, अशा तिखट शब्दात धनंजय मुंडेंनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे.

राज्यातील पूरस्थितीमुळे थांबण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सोमवार औरंगाबादच्या पैठणपासून पुन्हा सुरु करण्यात आली. यात्रेदरम्यान महाजनांसोबत धनंजन मुंडे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

मड्यावरचं लोणी खाणारी ही लोकं आहेत, असं म्हणत धनंजय मुंडेंनी स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाजानांसोबतच सदाभाऊ खोत यांचाही एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुनच मुंडेंनी त्यांच्यावरही टीका केली.  

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरस्थितीचा आढावा घेताना गिरीश महाजनांनी काढलेल्या व्हीडिओवरुन अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. हे टीकासत्र आणखी संपलं नसल्याचं यावरुन दिसून येतंय. 

हजारो-लाखो लोक पूरात अडकलेले असताना मंत्री आनंदात आहेत का???, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. गिरीश महाजानांनी पूरग्रस्तांना मदत करायची सोडून त्यांनी काढलेल्या व्हीडिओमुळे स्थानिकांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

-रवी शास्त्रींच्या निवडीवर कपिल देव म्हणतात…

-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे

-कलम 370 मुद्द्यावर अकबरूद्दीन यांनी पाकिस्तानी पत्रकारांची केली बोलती बंद!

-अधिकारी असावा तर असा…! तहसीलदाराने पूरग्रस्तांसाठी डोक्यावर उचलल्या तांदळाच्या गोण्या