संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. अशाच नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी. बॉलिवूड मधील एक आदर्श जोडपं म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं.

या जोडप्यांमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या केव्हा जास्त समोर आल्या नाहीत. मात्र, या जोडप्यामध्ये एकदा असं भांडण झालं होतं की चक्क ऐश्वर्याने अभिषेकला दोन रात्री रुमबाहेर ठेवलं होतं. याविषयी स्वत: अभिषेकने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

2014 साली अभिषेक बच्चनच्या टीमने ‘प्रो कबड्डी लीग’ जिंकली होती. या लीगपूर्वी अभिषेक आपल्या टीमसोबत चेन्नईला गेला होता. यावेळी अभिषेक चेन्नईच्या सत्यभामा युनिव्हर्सिटीचे संस्थापक कर्नल जेपीआर यांना भेटला होता. या भेटीने अभिषेकच्या जिवनात अनेक बदल घडवल्याचं अभिषेकने सांगितलं होतं.

अभिषेक ज्यावेळी जेपीआर यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटला त्यावेळी त्याने पाहिलं की त्यांच्या सर्व ट्रॉफीज जमिनीवर ठेवल्या आहेत. या ट्रॉफीज पाहून अभिषेकला खूप आश्चर्य वाटलं होतं. त्याने जेपीआर यांना याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर जेपीआर यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून अभिषेक खूप प्रभावित झाला होता.

अभिषेकने यावेळी जेपीआर यांना याबद्दल प्रश्न विचारला असता एका अभिनेत्याच्या डोळ्यातील याबदद्ल जाणून घेण्याची उत्सुकता पाहून त्यांनी स्मितहास्य दिलं. यानंतर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, मी जाणिवपूर्वक पुरस्कार जमिनीवर ठेवले आहेत. कारण पुरस्कारांना कधीच डोक्यावर चढू द्यायचं नसतं.

चेन्नईहून घरी जाताच अभिषेकने शोकेसमधील सर्व ट्रॉफीज काढून जमिनीवर सजवून ठेवल्या. थोड्यावेळाने ऐश्वर्या रुममध्ये आली आणि हे सर्व पाहून ती फार संतापली. अभिषेकने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐश्वर्याने त्याचे काहिही ऐकलं नाही.

यावेळी ऐश्वर्याला एवढा राग आाला होता की, अभिषेकला यानंतर दोन रात्री रूमबाहेर काढाव्या लागल्या होत्या. दोन दिवसांनंतर ऐश्वर्याचा राग शांत झाला आणि सर्व काही ठिक झालं.

महत्वाच्या बातम्या-

पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते

नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरंच विवाह बंधनात अडकणार? अभिनेत्रीची टीम म्हणाली…

‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ

‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो