पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते

मुंबई | शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारीत ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रम बत्रा हे कारगिल युद्धावेळी नायक होते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धवेळी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. एक धाडसी सैनिक म्हणून बत्रा यांची ओळख आहे. त्यांच्या जिवनात अनेक थरारक किस्से घडले होते. याविषयी काही वर्षांपूर्वी त्यांचा भाऊ विशाल बत्रा यांनी एका मुलाखतीत माहिती दिली होती.

कारगिल युद्धावेळी विक्रम बत्रा यांच्या एका उत्तराने पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीन निसटली होती. असा एक किस्सा देखील विशाल बत्रा यांनी यावेळी सांगितला होता.

पाकिस्तानी सैन्य आणि विक्रम बत्रा यांच्यामध्ये कारगिल युद्धावेळी संभाषण चालू होतं. यावेळी एका पाकिस्तानी सैनिकाने विक्रम बत्रा यांच्याकडे सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची मागणी केली होती. पाकिस्तानी सैन्याच्या या मागणीवर बत्रा यांनी जे उत्तर दिले त्याने पाकिस्तानी सैन्याला चांगलीच धडकी भरली होती.

याविषयी बोलताना विशाल बत्रा म्हणाले की, युध्दाच्यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी विक्रमच्या रेडिओला इंटरसेप्ट केलं होतं. ते त्याला धमकी देत होते. यावेळी एक सैनिक विक्रमला म्हणाला की, आम्ही तुम्हाला हरवू आणि तुमची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला घेऊन जावू.

यानंतर विक्रमने शांतपणे टेकडीवर एक ग्रेनेड बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकल्यानंतर तो पाकिस्तानी सैन्याला म्हणाला की, माधुरी दीक्षितकडून तुमच्या सैन्याला एक लहानशी भेट. यानंतर त्या टेकडीवरून पाकिस्तानच्या बखरी बरखास्त करून तिथे तिरंगा फडकवण्यात आला, असा किस्सा विशाल बत्रा यांनी यावेळी सांगितला होता.

दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारीत असणाऱ्या शेरशाह चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. बत्रा यांच्या आयुष्यातील अनेक थरारक किस्से या चित्रपटात पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरंच विवाह बंधनात अडकणार? अभिनेत्रीची टीम म्हणाली…

‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ

‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ