चिदंबरम यांनी सुटकेचा निश्वास सोडला… या तारखेपर्यंत अटक नाही!

नवी दिल्ली |  आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी आदेश दिले जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यानंतर चिदंबरम यांना 5 सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.

न्यायमूर्ती आर बानुमती आणि न्यायमूर्ती आर एस बोपन्ना यांच्या द्वीसदस्यीय खंडपीठाने चिदंबरम यांना अटकेपासून देण्यात आलेल्या अंतरिम संरक्षणात पुढील गुरूवारपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आज झालेल्या सुनावणीवेळी चिदंबरम यांनी सोमवारपर्यंत म्हणजेच 2 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीमध्ये राहण्याची तयारी दर्शवली होती.

दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणी 305 कोटींच्या परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात अफरातफर केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांच्यावर ठेवण्यात आला आहेत.

महत्वाच्या बातम्या-