पंकजा मुंडे आणि रोहित पवारांनी एकत्र काम करण्यासाठी भाजपच्या सुजय विखे पाटलांची साद, म्हणाले…

मुंबई | सध्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते सतत एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र, हे नेते एकमेकांवर टीका करत असले तरी ज्यावेळी एखाद्या घटकाविषयी गंभीर प्रश्न  उभा राहतो त्यावेळी हेच नेते एकत्र येवून काम करताना पहायला मिळतात.

अशातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी ‘चला हवा येवू द्या’च्या मंचावर ऊस तोडणी कामगारांच्या मदतीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांना भावनिक साद घातली आहे. चला हवा येवू द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंगळवारच्या भागात भाजप नेते सुजय विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासह रोहित पवार यांनी हजेरी लावली होती.

यावेळी अभिनेता सागर कारंडे यांनी ऊस तोडणी कामगारांच्या अडचणी मांडणारं एक भावनिक पत्र कार्यक्रमात वाचून दाखवलं. सागर कारंडे यांच्या या पत्रानंतर मंचावर उपस्थित तिनही नेत्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिल्या.

सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले की, ऊसतोड मजुरांसाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करायला हवं. माझ्या, रोहित पवारांच्या किंवा पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत. आम्ही जर एकत्र आलो तर खूप चांगलं काम होईल. सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून हे काम केलं पाहिजे.

यासाठी पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यातील कोणीही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नासाठी पुढे झाले तर आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. मात्र, पक्षाच्या पलीकडे जावून चांगल्या विचारांनी काम करूया, असं मत सुजय विखे पाटील यांनी मांडलं आहे.

तसेच आज आम्ही सर्वजण तरुण आहोत. किंबहुना आम्ही जेवढे तरुण आमदार खासदार असू त्या सर्वांनी ऊस तोडणी मजुरांच्या प्रश्नांसाठी एकत्र बसलं पाहिजे.

प्रत्येकाने काही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या पाहिजेत. फंड तयार करून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी किंवा रुग्णालयाची जबाबदारी घेऊ शकतो का, यावर चर्चा केली पाहिजे, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी यावेळी मांडली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात खूप खेळीमेळीचं वातावरण पहायला मिळालं. सुजय विखे पाटील यांच्या बरोबरच रहित पवार आणि पंकजा मुंडे यांनी देखील यावेळी ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर आपलं मत मांडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

विधान परिषदेत मारहाण! धक्काबुक्की करत उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचले; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला पुणे पोलिसांकडून अ.टक;

सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!

चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…

हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं! मुनगंटीवारांचं ‘ते’ चॅलेंज स्विकारत अजित पवार म्हणाले…