विधान परिषदेत मारहाण! धक्काबुक्की करत उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचले; पहा व्हिडिओ

बेंगळूरू | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर खालच्या पातळीवरील टीका करत आहेत. परंतु आता कर्नाटक विधान परिषदेत याच्याही पुढील प्रकार घडला आहे.

नुकतंच कर्नाटक सरकारने गायींचे रक्षण करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडलं होतं. पण या विधेयकानंतर सभागृहात मोठा गदारोळ उडाला आहे. कर्नाटक विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सभागृहातच धक्काबुक्की झाली आहे.

या नव्या कायद्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये मतभेद होते. मात्र, हेच मतभेद थेट हानामारीपर्यंत पोहचले आहेत. या घटनेमुळे लोकशाहीला आणि संसदीय प्रणालीलाच काळीमा फासली गेल्याचं लोकांचं म्हणनं आहे.

सभागृहाचे काम चालू होतानाच विधान परिषदेतील काही आमदारांनी उपसभापतींना थेट खुर्चीवरून खाली खेचले. उपसभापतींनी या खुर्चीवर बसणे असंविधानिक आहे, असं या नेत्यांचं म्हणनं आहे.

सभागृहातील हा वाद चांगलाच पेटला होता. यानंतर अखेर हाऊस मधील मार्शल्सला या वादात हस्तक्षेप करावा लागला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. कॉंग्रेसने विधान परिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

दरम्यान, या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. कर्नाटक विधान परिषदेत घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देशातून कर्नाटक विधान परिषदेतील नेत्यांवर टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला पुणे पोलिसांकडून अ.टक;

सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!

चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…

हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं! मुनगंटीवारांचं ‘ते’ चॅलेंज स्विकारत अजित पवार म्हणाले…

पीएम उज्ज्वल योजनेंतर्गत 3200 रुपये भरून एक लाखाचं कर्ज मिळणार? वाचा सविस्तर