शेतमजूराच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश रखडला; पंकजा मुंडेंनी केली दीड लाखांची मदत

बीड : उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असतो मात्र पैसे नसल्याने नाराज झालेल्या अनेक विद्यर्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललेल्या घटना आपण ऐकत असतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका होतकरु कुटुंबातील एका मुलाला चांगले गुण मिळूनही त्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण होतंय की नाही, अशी त्याला धाकधूक होती.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना त्या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरख मुंडे या विद्यार्थ्याने NEET परिक्षेत 505 गुण मिळवले. त्याचा सोलापूरमधील आश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात क्रमांक मिळाला. तो एमबीबीएसला जाणारा गावातला पहिला विद्यार्थी ठरला. मात्र अर्थिक परिस्थीतीमुळे तो हतबल झाला होता.

गोरखच्या सर्व परिस्थितीचं वृत्त एका वेबपोलर्टने दिलं होतं. हे वृत्त पंकजा मुंडेंनी वाचल्यानंतर त्या वृत्ताला कमेंट करत त्यांनी मदत जाहीर केली आहे. 

कृपया माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा. आपला प्रश्न मला व्यथित करतोय… मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करते. गोपिनीथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आपल्या पुढील शिक्षणासाठी 1 लाख 51 हजार रुपयांची मदत करण्याची इच्छा आहे, अशी कमेंट पंकजा मुंडेंनी केली आहे.

गोरख शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयानेही त्याला 50 हजारांची मदत केली असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”

-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

-…तर काट्याने काटा काढावा लागेल; शिवेंद्रराजेंचं खुलं आव्हान

-…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!