बीड | शहरात आज नगर-अष्टी रेल्वे (Nagar Ashti Railway) मार्गाचा लोकार्पन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देेवेद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे आदी नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रत्यक्ष या कार्यक्रमास जाता आले नाही. त्यामुळे दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) समारंभास हजर होते. यावेळी मान्यावरांच्या उपस्थितीत रेल्वेला हिरवा कंदील दाखविण्यात आला.
यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाषण दिले. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले होते.
ते आश्वासन आज पूर्णत्वास आल्याचे मुंडे म्हणाल्या. या मार्गाला दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी आम्ही करणार नाही, असे देखील मुंडे यांनी स्पष्ट यावेळी केले.
हा मार्ग रेल्वे विभागासाठी फायद्याचा ठरणार नाही. तरी देखील पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) प्रयत्नाने हा मार्ग तयार झाला आणि बीडकरांंच्या सेवेत अर्पण करण्यात आला, असे मुंडे म्हणाल्या.
हा मार्ग आगामी काळात मुंबई ते परळी पर्यंतचा व्हावा, अशी आशा देखील मुंडे यांनी व्यक्त केली आहे. हा मार्ग मराठवाड्यातील जनतेचा प्रवास सुखकर करणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार सांभाळतात! राष्ट्रवादीने दिला पुरावा
राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा
‘काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य’
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…