“आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे, वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर…”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आजोयित कार्यक्रमाचं बोलताना याच दिवशी आपल्या आईचा जन्म झाल्याने हा दिवस महत्वाचा असल्याचं पवारांनी म्हटलं.

आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर 12 डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचाही जन्म झाला म्हणून!13 डिसेंबरला माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो. तसेच याच आसपास माझ्या अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो, असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

माझ्या आईंनी खूप कष्ट घेऊन आम्हाला वाढवलं. त्या शेती करायच्या, तर वडील नोकरी करायचे. शेतीत जे काही पिकत असे, ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही करायचे. त्या काळातही आमच्या आईंच्या विचारांची झेप मोठी होती, असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या आई शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, आईच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज आम्ही सगळे काम करत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांचं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-