पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध सुरू असतं. मात्र एका विवाह सोहळ्यात दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

अनेक वेळा हे बहिण भाऊ एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. मात्र या लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसले होते.

धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित दिसून आले.

लग्न समारंभानंतर परिवारासोबत जेवण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रज्ञाताई पोहोचल्या त्यावेळी स्वतः पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा जेवणासाठी आग्रह केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र बसून जेवण केलं.

रिवारातील सदस्यासोबत मनमोकळ्या गप्पा यापूर्वी झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. या लग्न सोहळ्यात मात्र परिवारातील सगळे सदस्य एकत्रितपणे पाहायला मिळाले.

हॉटेल कार्निवल या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांच्या भाचीचा विवाह असल्यामुळे धनंजय मुंडे हे सकाळपासूनच उपस्थित होते.

नेक वेळा धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे व्यासपीठावर काही वेळा एकत्रित आले असले तरी आज मात्र त्यांच्यामध्ये होणारा संवाद हा सगळ्यांसाठीच नवीन होता.

महत्वाच्या बातम्या- 

कोरोनातून बरं झालेल्या व्यक्तीवर झाला भयंकर परिणाम; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

‘किरीट सोमय्यांना मानसिक धक्का बसलाय’, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार