नवी दिल्ली | राज्यात काही दिवसांपूर्वी अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यावरून बराच वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना अटक केली होती.
नवनीत राणा यांनी आपल्यावर अमरावती पोलिसांनी अन्याय केल्याचं वक्तव्य लोकसभेत बोलताना केलं होतं. त्यानंतर या वादाला नव्यानं सुरूवात झाली आहे.
नवनीत राणा यांनी पोलिसांविरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्विकारला आहे.
लोकसभा अध्यक्षांनी मुंबई, अमरावती, पोलिसांसह सहा जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी परत एकदा केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस आयुक्त, मुंबईचे डीजी, अमरावतीच्या पोलीस आयुक्त, अमरावतीचे डीसीपी या चौघांना संसदेत बोलावण्यात आलं आहे. संसदेला या चारही जणांचं उत्तर अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी आमच्यावर अन्याय झाला. माझ्या हक्कभंग प्रस्तावाला बाकीच्या खासदारांनी देखील समर्थन दिलं आहे, असं राणा यांनी म्हटलं आहे.
पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात मी ईडी आणि सीबीआयकडं तक्रार दाखल करणार आहे. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
दरम्यान, माझ्यासोबत गैरव्यवहार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आपण शांत राहणार नसल्याचं राणा यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”
“भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”