Weather Forecast: पुढील 4 दिवस उष्णतेची लाट; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे अनेक समस्यांना सामोरंं जावं लागत आहे. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा (Weather Forecast) हे तिन्ही आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.

महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. अनेक जिल्ह्यात सुर्य आग ओकत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशाच्या पुढेे गेल्याचं दिसतंय.

चंद्रपूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे आता घरातून बाहेर पडणं देखील अशक्य झालं आहे.

हवामान खात्याने आज अहमदनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे आता या सहा जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवणार असल्याचं पहायला मिळतंय.

आज सकाळपासून उष्णतेची लाट तीव्र झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पुढील 3 ते 4 दिवसांसाठी IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केंद्र-राज्य संघर्ष वाढणार?; राज्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस, वाचा नेमकं प्रकरण काय?

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”