उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?

नाशिक | राजकीय वर्तुळात केव्हा काय घडेल याविषयी काहीच सांगता येत नाही. महाराष्ट्रातील राजकारणातही सध्या अशाच काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचं तीन चाकी सरकार असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शिवसेना स्वबळावर भगवा झेंडा फडकवणार, असं नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरून पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शरद पवार यांनी शिवसेनेचे कान उपटले आहेत.

शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार असं शिवसेनेचे नेते शिवसैनिकांना सांगत असतील. मात्र, गेल्या 30 वर्षांपासून मी सतत हे ऐकत आलो आहे, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना काही महत्वाचे सल्ले देखील दिले आहेत.

भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये. महाविकास आघाडीच्या सरकारला जनतेने पसंती दिली आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.

तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना ज्याचा त्याचा पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की नाही हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी कांदा व्यापारी, शेतकरी आणि बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा केली . कांदा प्रश्नावर लवकरात लवकर केंद्र सरकारनं तोडगा काढावा, अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत.

महाराष्ट्रावर आपल्याला शिवसेनेचा एकहाती झेंडा फडकवायचा आहे. यादृष्टीने सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच आदेशावर पवारांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार

कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?

पंकजा मुंडे शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या वाटेवर? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं अनेकजण गोंधळात

सुशांत प्रकरणी दीपिकाला मोठा धक्का! ‘या’ व्यक्ती विरोधात होणार कारवाई