पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

शुक्रवार म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. आजही त्यांच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचं समजतं आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.44 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 105.45 रूपये आहे. तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 108.64 रूपये आहे आणि डिझेलचा दर 97.38 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?

“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”

‘या’ मंगळसुत्राच्या जाहिरातीवर नेटकरी संतापले; सब्यसाचीची जाहिरात चर्चेत

‘पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला