Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत. त्यामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम होत असलेला पहायला मिळत आहे.

युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला पहायला मिळत आहे. अशातच आता याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवरही झालेला पहायला मिळत आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 80 पैशांची वाढ होणार आहे.

देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेले पहायला मिळतात.

दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

  IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’

 “आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”

 Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…