मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसूली संचनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आता आणखीनच वाढण्याची शक्यता दिसतेय.
भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना मागील एका प्रकरणाची आठवण करून दिली आहे.
शिवसेना नेते मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. परिणामी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतला होता.
बाळासाहेब यांनी जो न्याय शिवसैनिकांसोबत केला तोच न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?, असा सवाल राणेंनी विचारला आहे.
बाळासाहेबांनी जो नियम वापरला होता तो वापरणार का?, की शिवसैनिकाला वेगळा आणि तुम्हाला वेगळा नियम?, असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.
नितेश राणेंनी श्रीधर पाटणकर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. परिणामी भाजप-शिवसेनेतील वाद मात्र वाढला आहे.
दरम्यान, श्रीधर पाटणकरांवर केलेली कारवाई मोदी सरकारनं महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी केली आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र
Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”