Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं

नवी दिल्ली | चीन सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. (Plane Crash in China) एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे एक प्रवासी विमान कोसळले आहे. या विमानात तब्बल 133 प्रवासी होते.

चीनच्या नैऋत्य भागात ही घटना घडली. या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळल्याचं वृत्त चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील दिलं आहे.

विमान कोसळताच आगीचे मोठे लोट दिसून आले. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आल्याचं चिनी मीडिया वाहिनीने सांगितलंय.

Guangdong येथील Guangzhou याठिकाणी हे विमान जाणार होतं. या विमानात 9 क्रु मेंबर्स होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बोइंग 737 प्रकारची विमानांची आधीही दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे आता चीनी सरकारचं टेन्शन वाढलंय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

नोरा फतेहीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

 ममता बॅनर्जी शाळकरी विद्यार्थ्यांबाबत घेणार ‘हा’ मोठा निर्णय

 “30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस

  …म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ