“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”

मुंबई | नुकताच रिलीज झालेला चित्रपट द कश्मीर फाइल्स सध्या देशभर चर्चेचा विषय बनतोय. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली जात आहे.

काश्मिरी पंडितांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय बनला आहे. दुसरीकडे मराठमोठे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे.

समाजाने डावललेल्या झोपडपट्टींच्या मुलांच्या भविष्यावर भाषण करणारा हा चित्रपट देखील अनेकांनी पसंत केला आहे. आमीर खान आणि इतर अभिनेत्यांनी देखील झुंड आणि द कश्मीर फाइल्सचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अशातच आता या दोन्ही चित्रपटावरून आता राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे. कश्मीर फाईल्सवरून दोन गट निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

परवा एक भाजपचे आमदार एका वृत्तवाहिनीवर तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही?, असा सवाल केला होता. त्यावरून अमोल मिटकरी यांनी खडे बोल सुनावले आहेत.

भाजपच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा मी थोडा पाठपुरावा केला. अमिताभ बच्चन बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपाच्या लोकांना खटकलंय का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

भाजपला झुंडचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?, असा थेट सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

दरम्यान, आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे, असंही टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं

नोरा फतेहीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

 ममता बॅनर्जी शाळकरी विद्यार्थ्यांबाबत घेणार ‘हा’ मोठा निर्णय

 “30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस