‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त

नवी दिल्ली | सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपल्याला जगभरातील वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात. सोशल मीडियावर अनेक खळबळजनक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या एका अभिनेत्रीचा असाच एक व्हिडीओ खूप जास्त व्हायरल होत आहे.

भोजपूरी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री त्रिशा कर मधू हिचा एक MMS सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या MMSमध्ये त्रिशाचे आपल्या जोडीदारासोबतचे काही खासगी क्षण कैद झाल्याचं दिसत आहे. यु ट्यूबवर अनेक चॅनेल्सने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

त्रिशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा व्हिडीओ डाऊनलोड तसेच शेअर न करण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे. तरी देखील हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे त्रिशाने आता पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. तिने सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

त्रिशाने काही दिवसांपूर्वी यासंंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ती म्हणाली होती की, देव सर्वकाही पाहत आहे. माझी होत असलेली प्रगती पाहवत नसल्याने मला खाली खेचण्यासाठी माझा खासगी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

तुमच्या बहिणीशी कोणी लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या मधूचंद्राच्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगलं वाटेल ना? बिहारमध्ये एवढ्या नीच विचारसरणीचे लोक असतील याची मला कल्पणा देखील नव्हती, असं म्हणत त्रिशाने यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

काही युट्युब चॅनेलवर या व्हिडीओचा सुरुवातीचा भाग दाखवण्यात आला आहे. तसेच संपूर्ण व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. ही लिंक ओपन करुन कृपया कोणी व्हिडीओ डाऊनलोड करु नका, असं आवाहन त्रिशाने केलं आहे.

दरम्यान, त्रिशा कर मधू नेहमीच तिच्या बोल्ड व्हिडीओजमुळे चर्चेत असते. हा व्हिडीओ देखील तिने स्वत:च सोशल मीडियावर शेअर केल्याच्या चर्चा आहेत. जर हा व्हिडीओ तिने शेअर केला नाही तर तिच्या खासगी फोनमधील व्हिडीओ व्हायरल कसा झाला, असा सवाल नेटकरी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

लग्न मंडपातच नवरदेवाच्या आले नाकी नऊ, पाहा व्हायरल व्हिडीओ

वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ

नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ