पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या शूटींगमध्ये व्यस्त???

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिस्कव्हरी चॅनलवर गाजलेल्या ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात मोदी चक्क वन्यजीवप्रेमीच्या रुपात दिसणार आहेत. मात्र यामुळे आता एका वेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे.

भारतावर झालेल्या पुलावामा हल्ल्याच्या दिवशीच या कार्यक्रमाचे चित्रिकरण झालं असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला होता. 

ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास मोदींना जिम कार्बेट नॅशनल पार्कमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं. त्यावरुन मोदींवर अनेकांनी टीका केली. 

‘मॅन वर्सेस वाईल्ड’चा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर चॅनलला त्या कार्यक्रमाचं संपूर्ण दिवसाचं शूट सार्वजनिक करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

शूट सार्वजनिक झाल्यानंतर हे लक्षात येईल की मोदी पुलवामा हल्ल्याच्या दिवशी किती तास शूटींगमध्ये व्यस्त होते, असं काँग्रेसकडून बोललं जात आहे. 

12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात मोदी ग्रिल्ससोबत जंगली सफारी करताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचं औचित्य साधून कार्ययक्रमाचे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स यांनी याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनोखा चेहरा 180 देशातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे, असं ग्रिल्स यांनी ट्विट केलं आहे. ग्रिल्स यांनी ‘#PMModionDiscovery’ हा हॅशटॅग ट्विट केला आहे. 

भारतातील संपन्न नैसर्गिक वारसा जगापुढे आणण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मला ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामुळे मिळाली आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-“राष्ट्रवादीचे गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत”

-रोहित शर्मा बरोबरच्या वादावर विराट कोहलीचा मोठा खुलासा!

-आता 11 वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशीप’चा धडा!

-चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली!

-एकदिवसीय विश्वचषकानंतर आता थरार कसोटी विश्वचषकाचा! आयसीसीने केलं वेळापत्रक जाहीर