पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता. यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलं.

देशात आता लॉकडाऊन नाही तर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पद्धतीने आता पुढे जायचं आहे, असं पंतप्रधनांनी सांगितल्याची माहिती चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने दिली आहे.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

अनलॉक नंतर भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज काही हजार रुग्णांची देशात भर पडत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या आत्महत्येने शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला….

-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

-भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड

-“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

-शहि…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत