भर चौकात पोलिसांचा जोडप्यावर गोळीबार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आपला चांगलाच थरकाप उडवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका मॉलबाहेर पोलिसाने एका जोडप्यावर गोळीबार केल्याचं दिसत आहे. एका मॉलबाहेर भरदिवसा पोलिसांची दहशत चालल्याचं पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडीओ खरा आहे का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊया…

व्हिडीओ खरा की खोटा?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका रेस्टॉरंट बाहेर एका व्यक्तीची आणि पोलिसाची बाचाबाची चालू आहे. या दोघांच्यातील हा वाद इतका वाढतो की पोलीस त्या व्यक्तीला जमिनीवर ढकलून देतो आणि त्याच्यावर गोळीबार करतो.

आपल्या जोडीदारावर गोळीबार झाल्यानंतर पत्नी मोठं मोठ्याने ओरडू लागते. हे पाहून तो पोलीस कर्मचारी तिच्यावर देखील गोळीबार करतो. हे पाहून आसपासचे सर्व लोक खूप घाबरतात.

मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका वेब सिरीजच्या चित्रिकरणादरम्यानचा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. अनेकजण उत्तर प्रदेश पोलिसांवर जहरी टीका करत होते.

यामुळे उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ एका वेब सिरीजचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंबंधीत एक ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे.

राहुल श्रीवास्तव ट्विट करत म्हणाले की, एका रेस्टॉरंट बाहेर पोलिसाने केलेल्या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबद्दल आम्ही तपास केला तेव्हा हा व्हिडीओ हरियाणातील कर्नालमधील असल्याचं समोर आलं आहे.

ज्या रेस्टॉरंट बाहेर हा प्रकार घडला आहे, त्याच्या मॅनेजरकडे आम्ही याबद्दलची चौकशी केली आहे. यावेळी त्या मॅनेजरने एका वेब सीरिजसाठी केलेल्या चित्रिकरणाचा हा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

तसेच पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या वेब सिरीज बॅन कराव्यात, अशी देखील मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे. श्रीवास्तव यांनी हे ट्विट करताना त्याच्यासोबत व्हायरल होणारा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –  

IPL 2021: ….म्हणून अभिनेता शाहरुख खाननं मागितली केकेआरच्या चाहत्यांची माफी

अभिनेत्री नोरा फतेही आणि माधूरीनं केला ‘या’…

भल्या मोठ्या सिंहाने त्यांच्या अंगावर झेप घेतली अन्…

‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ