IPL 2021: ….म्हणून अभिनेता शाहरुख खाननं मागितली केकेआरच्या चाहत्यांची माफी

मुंबई| आयपीएलच्या सामन्यांना नुकतीच काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघामध्ये चुरशीचा सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला. केकेआरच्या या पराभवानंतर या संघाचा मालक आणि बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खानने चाहत्यांची माफी मागितली आहे.

शाहरुखने ट्विटरवर ट्विट करुन चाहत्यांची माफी मागितली आहे. केकेआरच्या निराशाजनक कामगिरीवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुखचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहते यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

कोलकाता संघाचा पराभव झाल्यानंतर शाहरुख खान नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने लगेच ट्वीट करत चाहत्यांची माफी मागितली आहे. केकरच्या पराभवानंतर शाहरुखने एक ट्विट केले.

शाहरुखने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, निराशाजनक कामगिरी, थोडक्यात सांगाल, मी कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो. असं ट्वीट त्याने केलं आहे.

मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली होती. या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहरनं  गिलला 33 धावांवर बाद केलं.

त्यानंतर चहरनं ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. दुसऱ्या बाजुला असलेल्या नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, त्याला आपली खेळी वाढवता आली नाही. चहरने त्यालाही बाद करत कोलकाताचे संकट वाढवलं. राणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. परिणामी अपेक्षित धावा आणि चेंडू यांचं अंतर अधिक वाढत गेलं. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली.

शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टनं रसेल आणि कमिन्स यांना बाद केलं. आणि मुंबईनं यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.

दरम्यान, शाहरुखच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास किंग खान सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग हे दुबईमध्ये पूर्ण करण्यात आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या –  

अभिनेत्री नोरा फतेही आणि माधूरीनं केला ‘या’…

भल्या मोठ्या सिंहाने त्यांच्या अंगावर झेप घेतली अन्…

‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस