“नरेंद्र मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल”

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा सर्वात मोठा चेहरा आहेत. केंद्रीय सत्तेला विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष धडका घेताना आपण पाहिले आहेत. आताही असंच प्रकरण सध्या तेलंगणामध्ये गाजत आहे.

भाजपच्या नेत्यांना आरेरावीची भाषा केली म्हणून इतके दिवस तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव चर्चेत होते. पण आता भाजपच्या खासदारानं चंद्रशेखर यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

चंद्रशेखर यांनी मोदींशी पंगा घेतला तर त्यांचं राजकीय जीवन संपुष्टात येईल, असं वक्तव्य निजामाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केलं आहे. यावरून तेलंगणामध्ये जोरदार वाद पेटला आहे.

जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडं धावत येतो. तसंच आता चंद्रशेखर राव यांच्या राजकारणाचा मृत्यू जवळ आला आहे, असं वादग्रस्त वक्तव्य धर्मपुरी यांनी केलं आहे.

तेलंगाणामध्ये भाजप आणि टीआरएसमध्ये जोरदार राजकीय युद्ध सध्या रंगलं आहे. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

टीआरएसकडूनही भाजपवर जोरदार टीका होत आहे. नुकतंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला आहे. मोदी यांच्या धोरणावरही केसीआर यांनी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपच्या नेत्यांची जीभ कापण्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

तेलंगाणातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही भाजपनं केसीआर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केसीआर राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी धर्मुपुरी यांनी केली आहे.

तेलंगणामधील एकचाही पद्म पुरस्कारांमध्ये समावेश का नाही. मुख्यमंत्र्यांनी या पुरस्कारांसाठी राज्यातील नागरिकांची शिफारस का केली नाही, असा सवालही धर्मपुरी यांनी केसीआर यांना केला आहे.

दरम्यान, तेलंगणामध्ये राजकीय परिवर्तन येणार आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सरकारनं राज्यावर मोठा अन्याय केला आहे. येणाऱ्या काळात या सरकारचं विसर्जन जनताच करेल, असं धर्मपुरी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत