मुंबई| एनसीबीची सध्या ड्रग्ज प्रकरणात सगळीकडे छापेमारी सुरु आहे. यातच त्यांनी अनेक ठिकाणी मोठे छापे टाकत बऱ्याच लोकांना अटक केली आहे. हे सुरु असतानाच आता गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नुकतंच गुजरातच्या द्वारकामध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडलं आहे. यासोबतच काही हेराॅईनही जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे 350 कोटी रुपयांचे 66 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्जसह हेराॅईनही जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी कारवाई केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, द्वारकेत ड्रग्ज सापडनं ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम वगैरे ड्रग्ज पकडून जागतिक प्रसिद्धी प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या 350 किलो ड्रग्जचा अभ्यास करावा.
पुढे राऊत यानी म्हटलं, यापूर्वीही गुजरातमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. ही गुजरातमधून ड्रग्ज जप्त करण्याची दुसरी वेळ आहे. आता त्यामध्ये गुजरातमधली चित्रपटसृष्टीतील काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील. त्या लोकांनी पाहावं आता एनसीबीचं पथक नेमकं काय काम करत आहे गुजरातमध्ये.
गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केलं आहे. याचा ड्रग्ज प्रकरणाचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता गुजरातच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजायला सुरुवात झाली आहे.
गुजरातमध्ये हा ड्रग्जचा खेळ रंगला असल्याचं म्हणत अनेक राजकीय नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरात ड्रग्ज रॅकेटचे केंद्र बनू लागलं असल्याचंही आता म्हटलं जात आहे.
350 कोटी ड्रग्ज प्रकरणी सापडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र आता याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त
‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा
“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”
“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”
मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’