संजय राठोड बंडखोर होताच शिवसैनिक भडकले, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुंबई | महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. अलीकडे संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात घरवापसी करणार अशी चर्चा रंगली होती. पण शिंदे यांनी बंड पुकारलं आणि संजय राठोड गुवाहाटीमध्ये दाखल झालेत.

आजपर्यंत संजय राठोड यांचं समर्थन करणारे शिवसैनिक संतापले आहे. राठोडांना शिवसैनिकांनी गंभीर इशारा दिला आहे. यामुळे राठोडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सोबत आले आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड (shiv sena mla sanjay rathod) यांचाही समावेश आहे. आता शिवसैनिकांनीच संजय राठोड यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.

संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू, या प्रकरणातली 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार असा सवालही गायकवाड यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…” 

‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण