म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणाला नवं वळण; तपासातून अत्यंत धक्कादायक खुलासा

सांगली | सांगलीतील म्हैसाळ येथे 20 जून रोजी सोमवारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली होती. यात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

9 जणांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हत्याकांड प्रकरणी दोन व्यक्तीना अटक देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच असल्याचे उघडकीस आले आहे.

यामागे गुप्तधनाचं कारण असून या प्रकरणी एका मंत्रिकासह एकास पोलिसानी अटक केली आहे. या घटनेत नव्याने अटक केलेले दोघे संशयित आरोपी हे मयताच्या घरी येत होते. यावेळी आरोपी आणि मयतामध्ये गुप्तधनाच्या चर्चा होत होत्या.

गुप्तधनाच्या विषयावरूनच यातून 9 जणांच्या हत्या झाल्या. यामध्ये दोन व्यक्तीनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्याना मारण्यात आलं असून या प्रकरणी दोघेजण अटकेत असून या दोन जनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हत्याकांडाप्रकरणी आब्बास महमंदअली बागवान वय 48 वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय 30 वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं 59 जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…” 

‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा