मुंबई | आयटम गर्ल राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. राखी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला राखीमध्ये आहे. यामुळे राखीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
अशातच आता बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनसाठी अभिनेता अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना हिने खास पोस्ट लिहिली आहे. ट्विंकलने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून राखी चांगलीच भावूक झाली आहे.
ट्विंकलने या पोस्टमध्ये राखीची मनापासून प्रशंसा केली आहे. तिने राखीचे काही फोटोज देखील शेअर केले आहेत. भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेले राखीचे हे फोटोज आहेत.
राखीची प्रशंसा करताना ट्विंकल म्हणाली की, गेल्या अनेक वर्षांपासून राखीची सर्वांकडून खिल्ली उडवली जात आहे. परंतु राखीने या सर्व गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. राखीच्या जागी मी असते तर कदाचित या सर्व गोष्टी सहन करू शकले नसते.
मी स्वतःला कुठेतरी लपवून घेतलं असतं आणि उर्वरित सर्व आयुष्य असंच काढलं असतं. परंतु राखीवर आपण जितके हसू तितकेच ती देखील हसत राहते. राखीने स्वतःच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं आणि इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे, असं ट्विंकलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच पुढे ती म्हणाली की, राखी सावंत सर्वकाही आहे आणि तिच्यासारखी मी केव्हाच होऊ शकत नाही. यामुळे राखी सावंत मला आवडते. दरम्यान, ट्विंकलच्या या पोस्टनंतर राखी चांगलीच भावूक झाली आहे. तिने ट्विंकलच्या पोस्टचा फोटो शेअर करत तिचे आभार मानले आहेत.
तुझ्या बिझी लाईफमधून वेळ काढत माझ्यासाठी पोस्ट लिहिल्याबद्दल मी तुझे आभार मानते. लोकांना हसवून त्यांचं मनोरंजन करून मी अनेक अडचणींवर मात केली आहे. आज मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते. मी जे काही कमावलं त्याचा मला अभिमान आहे, असं राखीने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून करीनाला सैफकडून नव्हे तर ‘अशा’ पद्धतीने मूल हवं होतं
सायरा बानोंची तब्येत खालावली, आयसीयुमध्ये उपचार सुरू
चक्क घरात शिरला बिबट्या अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहु नका
माणुसकीला जागत कुत्र्याला वाचवण्यासाठी ‘या’ प्रकारे तरूणाने घेतली धाव, पाहा व्हायरल व्हिडीओ