सुंदर त्वचेसाठी बटाटा आहे खूपच गुणकारी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

स्वयंपाकघरातील पाककृतींसाठी बटाटा सर्वसमावेशक मानला जातो. कारण काही लोक कोणत्याही प्रकारच्या भाजी, आमटी, डाळी, इत्यादी पदार्थांमध्ये बटाट्याचा आवर्जून वापर करतात. चवीव्यतिरिक्त बटाट्यामध्ये पोषण तत्त्वांचा खजिना आहे. बटाटा ही अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन बी , लोह , कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतात. बटाटा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

1. ज्या प्रकारे बटाट्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते, त्याच प्रमाणे यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेचा रंग देखील उजळण्यात मदत मिळते. तुमच्या त्वचेवर डाग, मुरुम, सुरकुत्या इत्यादी समस्या निर्माण झाल्या असल्यास उपाय म्हणून कच्च्या बटाट्याचा उपयोग करावा.

2. चेहऱ्यावर एक बटाट्याचा तुकडा रगडा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल. त्यांनतर एक चमचा बटाट्याच्या रसात , एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्याला लावा व रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.

3. बटाटा त्वचेची समस्या सुधारण्यास मदत करतो. तर हळदीचे अँटीबॅक्टीरियल गुणधर्म  मुरुमांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करातात. बटाटा आणि हळद एकत्र केलेला फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. फेसपॅक बनवण्यासाठी किसलेले बटाटे घ्या, किसलेल्या  कच्च्या बटाट्यात एक चिमूटभर हळद घाला आणि त्यास अर्ध्या तासाने चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन दिवस हा पॅक वापरल्याने काही दिवसात आपला चेहरा निखारण्यास सुरुवात होईल.

4. आपल्या चेहर्‍यावरील डाग दूर करण्यात बटाटा उपयुक्त आहे. बटाट्यामध्ये लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण आपण चेहऱ्याला लावले तर डागांपासून आपली त्वचा मुक्त होईल.

5. किसलेला बटाटा आपल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याचा 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. चेहऱ्यासह तुम्ही आपल्या मानेवरही बटाटा लावू शकता.

6. बटाट्याचा रस डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी उपयोगी असतो. हा रस स्किनवरील ओपन पोर्स बंद करण्यासाठीही मदत करतो. ज्यामुळे स्किन टाइट राहते आणि वाढत्या वयाची लक्षणंही कमी दिसतात.

7. बटाट्यात दही मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो. यासाठी कच्चा बटाटा किसून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये दही मिसळा आणि थोडावेळ ठेवा. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहऱ्यावर  लावा. बटाटा आणि दही  याचे फेसपॅक  त्वचा साफ करतात. ज्यामुळे सुरकुत्या होण्याची समस्याही दूर होते.

8. कच्च्या बटाट्यासह आपण त्वचेवर मध देखील लावू शकता. या फेस पॅकमुळे त्वचेवरील दुर्गंध, धूळ-मातीचे कण स्वच्छ होतील आणि त्वचेला ओलावा मिळेल. फेस पॅक तयार करण्यासाठी बटाटा किसून त्याचा पल्प तयार करा. आता बटाट्याचा पल्प हातावर घ्या आणि चेहऱ्याचा मसाज करा.

महत्वाच्या बातम्या – 

2020 आयुष्यातील सर्वात वाईट काळ; अखेर सुशांतच्या मृत्यूवर…

‘रिप्ड जीन्सची सर्वांनाच चिंता या रिप्ड शर्टचं…

‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’…

‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा…

‘…बादशाह को बचाने में कितनो की जान…