प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambekdar) हे सध्या सांगली येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला आणि देशाच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.

आम्ही शिवसेना आणि काँग्रेसला युतीसाठी पत्र दिले आहे आणि त्यांच्यासोबत आघाडीला देखील आम्ही तयार आहोत. मात्र अद्याप त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर देखील टीका केली. भारत तुटला कुठे आहे, त्याला जोडायला? देश कुठे चालला आहे आणि राहुल गांधी कुठे चालले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर देखील टीका केली. पंडीत नेहरुंनी कबूतरे सोडली होती पण त्यासाठी त्यांनी आपल्या वाढदिवसाचा दिवस योजीला नव्हता.

पंतप्रधानांनी आपल्या वाढदिवसाला प्राणीसंग्रहलयात चित्ते सोडले. ते त्यातून देशात दहशत पसरवित आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच त्यांनी मोदींची तुलना दारुड्यासोबत केली आहे.

दारुड्याला दारु पिण्यास पैसे नसतील, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधनांची अवस्था तशीच झाली आहे, असे आंबेडकर म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर देखील आरोप केले आहेत.

राष्ट्रवादीकडे घड्याळ नसेल, तर त्यांचे 80% मतदान भाजपला जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले की भाजपला फायदा होतो आणि वेगळे लढले की भाजपला तोटा.

वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा (Vedanta Foxconn) गुजरातमध्ये करार झाला आहे. त्यामुळे आता काहीही केले तरी प्रकल्प परत येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक बंद करवी, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’

संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…

‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’

“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान

शरद पवारांची पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया