बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर

मुंबई | आपल्या सामोर कोरोना मुळे निर्माण झालेली आव्हाने खूप मोठी आहेत. कोरोना पसरण्या बरोबरच लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न लॉक डाऊन नंतरही विक्राळ रूप धारण करेल अशी शक्यता दिसते. आज ह्याची जबाबदारी शासनाबरोबर आपली पण आहे. मी आधी विनंती केल्याप्रमाणे, आंबेडकर जयंती साठी जमा केलेला निधी आपापल्या भागातील दुर्बल घटकांना जागविण्यासाठी वापरूयात, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि अत्यंत संयमाने आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पळून आपण सर्वांनी साजरी केली त्याबद्दल त्यांनी सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन केले. आपण फुले-शाहू-आंबेडकरी समाजाची प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकी सर्व देशाला दाखवून दिली, असं ते म्हणाले.

14 एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. भारतातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आनंद निर्माण करणारा हा दिवस. त्यामुळे हा दिवस कायम एक आनंदाचा सोहळा म्हणूनच साजरा केला गेला पाहिजे, असंही ते म्हणाले.

राजगृहावर काळे फडके फडकावल्याचा मुद्दा सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांतून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेला. त्याला कुणीही वेगळ्या प्रकारे विचारात घेऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे काळा दिवस असल्याचे मानता कामा नये, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-देशात लॉकडाऊन, मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींच्या मुलाचा लग्नसोहळा थाटामाटात

-MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

-“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”

-“शिधावाटपाच काम विनातक्रार व्हावं यासाठी पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घाला”

-“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”