पुणे : काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडी बरोबरची चर्चा थांबलेली आहे. मात्र एमआयएमसाठी चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. मात्र त्यांनी कुलूप लावलं असून चावीही त्यांच्याकडेच आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
एमआयएमने चर्चेसाठी दरवाजा उघडावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला केलं आहे. तसेच राज्यात मित्र पक्षाबरोबर 288 जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एमआयएम बरोबर युतीचे संकेत दिले आहे.
एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर आजही माझे खूप चांगले संबंध आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यादी फायनल करण्याचं काम सुरू असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
हो नाही म्हणता म्हणता भाजप-शिवसेनेचं अखेर ठरलं! – https://t.co/O8JIKGAgJY #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“युतीबाबत शिवसेना रिलॅक्स मोडमध्ये आहे” – https://t.co/tfrkCpcJ4Q @rautsanjay61 @OfficeofUT @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
काँग्रेसला 52 वर्षात जिंकता न आलेली ‘ती’ जागा राष्ट्रवादीला हवी आहे! – https://t.co/j5T81z29vq @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019