हो नाही म्हणता म्हणता भाजप-शिवसेनेचं अखेर ठरलं!

मुंबई : होय नाही म्हणता म्हणता अखेर शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार असल्याचं कळतंय.

शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु होती. मुख्यमंत्रिपद सेनेला अडीच वर्षे मिळावं, अशी सेनेची मागणी मध्यंतरी पुढे आली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करा, अशीही मागणी करण्यात आली होती.

प्रत्यक्ष जागावाटपात मात्र भाजपने सेनेला 126 जागांहून कमी जागा दिल्याची माहिती समोर आली होती. उद्धव ठाकरे या जागावाटपावर नाराज असून वेळ पडली तर शिवसेना वेगळी लढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, या साऱ्या नाराजीनाट्यावर पडदा पडल्याचं कळतंय. शिवसेना-भाजपचं जागावाटपाचं सूत्र नक्की झालं असून आता ते उद्या बाहेर येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-