‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | एकनाथ शिंदे गटाला हा दिलासा मिळाल्यामुळे आता एकनाथ शिंदे गट राज्यपालांना पत्र लिहून आपण पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करू शकतात का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये एकनाथ शिंदे गटाने आपण महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, असं सांगितलं आहे, पण त्यांनी राजभवनाला अजून तसं पत्र पाठवलेलं नाही.

एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाही, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी, कारण तसे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत, ज्यात न्यायालय मध्ये येऊ शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत

बैठकीला उपस्थित न राहणं हा शिवसेनेच्या घटनेमध्ये गुन्हा असेल तर उपाध्यक्ष तशी कारवाई करू शकतात, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

कोर्टाने हा निकाल अत्यंत विचाराने दिलेला आहे, कारण सध्या राज्यात राजकीय वातावरण शांत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-  

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…” 

‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये, शिंदे गटानं काढला पाठिंबा