मुंबई | विधानपरिषदेच्या उमेदवारी यादीतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव वगळल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपकडून मुद्दामुन पंकजा मुंडेंना डावललं जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
या मुद्द्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथील भाजप कार्यालय व केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला.
या घटनांवर आता मनसे नेते व पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रकाश महाजन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपमधूनच पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे. तर पंकजाची बदनामी करण्याचे व जनसामान्यात स्थान कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही महाजन यांनी केला.
हे कोण करतंय हे सर्वांना माहिती असल्याचंही प्रकाश महाजन पुढे बोलताना म्हणाले. एका पक्षाचा प्रवक्ता असलो तरी मामा म्हणून मला हा पंकजा मुंडेंच्या बदनामीचं कट कारस्थान वाटत आहे, असंही प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
स्त्री म्हणून पंकजावर बंधनं आहेत. म्हणून सर्वकाही उघड करता येत नसल्याचं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पंकजा स्वाभिमानी स्त्री आहे. पंकजा मुंडे यांनी कधीच विधान परिषदेच्या तिकिटाची मागणी केली नाही, असंही प्रकाश महाजन म्हणाले आहे. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांच्या विमानतळावरील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा?
पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत
‘…म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये’; जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले