पुणे | संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावर दाखल झाले व त्यानंतर हेलिकॉप्टरने देहूसाठी रवाना झाले.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पुणे विमानतळावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी व अजित पवार यांच्या विमानतळावरील फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं या फोटोत दिसत असून यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांचं स्वागत स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान मोदींचा हात अजित पवारांच्या खांद्यावर असाच राहिला तर राज्यातील राजकीय चित्र बदलू शकेल, अशा चर्चा या फोटोच्या निमित्ताने रंगू लागल्या आहेत.
2019 मधील पहाटेच्या शपथविधी सोहळ्यानंतर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार केवळ 80 तास टिकलं. आजही अजित पवार यांनी फडणवीसांची साथ द्यावी अशी इच्छा अनेक नेते बोलून दाखवतात.
दरम्यान, पंतप्रधान मोदी व अजित पवार यांच्या या फोटोनंतर पुन्हा अशाच चर्चा रंगायला सुरूवात झाली. मोदींचा हात असाच अजित पवारांच्या खांद्यावर राहिला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलेल, असं अनेकांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत
‘…म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये’; जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं